पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी तपास सुरू ,पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

0 9

पुणे –  दि ०७ फेब्रुवारी रोजी पुणे मधील हडपसर परिसरात  एका सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली .तिच्या आत्महत्यानंतर प्रसारमाध्यमात आणि सोशल मीडियावर राज्याचे एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा  सुरू झाली . याप्रकरणावरून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला करत आहे. भाजपचे दिग्गज नेते या प्रकरणावरून सध्या महाविकास आघाडीवर हल्ला करत त्या मंत्रीचा राजीनामा मागत आहे.

खरंच मागे ईडी लागली पण सीडी लावण्याचं काम आता बाकी आहे – एकथान खडसे

 राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तेसच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा याप्रकरणात राज्यसरकार वर टीका करत चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरी कडे  या संदर्भात भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी आठवडा होत आला तरी पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे.

सरकारने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये – चंद्रकांत पाटील

Related Posts
1 of 1,292

या प्रकरणात  एका वरिष्ठ अधिकाऱ्या पासून मिळालेल्या माहिती नुसार  पूजा पहिल्याच मजल्यावर होती. घटनेच्या वेळी ती दारु प्यायलेली होती आणि कठड्यावर बसली होती. त्यानंतर ती तिथून पडली. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात की अपघात ? या सगळ्या दिशांनी तपास होत आहे. अशी माहिती त्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर यांना अजित पवार यांनी दिला हा उत्तर , म्हणाले पठ्ठ्याचं … 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: