DNA मराठी

धक्कादायक दारुच्या नशेत पत्नीवर चाकूने वार अन्..

0 132
Atrocities filed in assault case; Success in pursuit of backward class organizations

 

अहमदनगर – दारूच्या नशेत पतीने (Husband) पत्नीवर (Wife) चाकूने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्या. पुजा निलेश फुलारे (वय २९ मुळ रा. उंदिरगाव ता. श्रीरामपूर, हल्ली रा. श्रीराम चौक) असे जखमी पत्नीचे नाव आहे.

 

बुधवारी पहाटे श्रीराम चौक येथे ही घटना घडली. या प्रकरणी पती निलेश फुलारे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पत्नीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान निलेशला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जखमी पूजावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निलेश हा दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ केली.

Related Posts
1 of 2,493

तुम्ही मला शिवीगाळ का करता, असे पत्नीने विचारल्याचा राग आल्याने पती निलेश याने घरातील भाजीपाला कापण्याचा चाकू घेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले तुला आज मारून टाकतो, अशी धमकी देवून वार केला व तेथून निघून गेला.

जखमी पूजा हिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पती निलेश याला अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: