मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – नवाब मलिक

0 81
 नवी मुंबई  –  नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. (Insults of Chief Minister is not their insult but it is insulted – Nawab Malik)
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
Related Posts
1 of 1,518

प्रकरण काय 

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.(Insults of Chief Minister is not their insult but it is insulted – Nawab Malik)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: