DNA मराठी

गुटखा प्रकरणात पोलीस महांचालक यांचे चौकशीचे आदेश

0 270
Inquiry order of Director General of Police in Gutkha case
श्रीगोंदा :- श्रीगोंदा काष्ठी रोडवर गुटखा लूट पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. यामध्ये पोलीस महासंचालक यांनी चौकशी करण्याचे आदेश पारित केल्याने आता पोलिसांसह गुटखा विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
श्रीगोंदा काष्ठी रोडवर हॉटेल अनंन्या जवळ पोलिसांनी खाजगी लोकांच्या मदतीने गुटखा लुटल्याप्रकरणी वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच तालुक्यातील तसेच राज्यातील काही संघटनांनी आवाज उठवत नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक तसेच पोलीस महासंचालक मुंबई याना निवेदने देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यावर कारवाई करत पोलीस महासंचालक यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक याना चौकशी करण्याचे आदेश देऊन त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले आहे.  या आदेशामुळे लूट प्रकरणात असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले असून त्याच्याबरोबर गुटखा विक्रेते यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणात दहशद निर्माण झाली आहे.  तसेच याबाबत तक्रार करणाऱ्या संघटनाच्या लोकांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आपले म्हणणे सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.  या सर्व प्रकारचा अहवाल तयार करून पोलीस महासंचालक याना पाठविण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Related Posts
1 of 2,482
जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या शोधात गुटखा विक्रेते आणि पोलिसही ?
गुटख्याचा खोटा गुन्हा अंगावर घेऊन जेलमध्ये बसलेला आरोपी याने काही जबाब देण्याकामी पोलीस ठाण्यात बोलाविले असता त्याने पोलिसांच्या समोर सांगितले कि सगळा माल हा पोलिसाचाच आहे या प्रकरणाशी माझा कोणत्याही प्रकरणाचा संबंध नाही असे सांगून निघून गेल्यावर अजब कारनामे करणारा पोलीस आणि तालुक्यातील गुटखा विक्रेते यांनी सर्वानी मिळून त्या बनावट आरोपीचा शोध घेताना दिसत होते पण तो मिळून आलेला नाही.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: