पुन्हा इंदुरीकर महाराज अडचणीत , “त्या” विधानावरून कारवाईची मागणी

0 433

 अहमदनगर –   आपल्या काहींना काही  वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमी चर्चेत रहाणारे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी कोरोनावर वादग्रस्त विधान केला आहे. या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना  गाठणारच असे  वक्तव्य इंदोरीकरांनी कीर्तनातून करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या  तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे तसेच त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (Indurikar Maharaj in trouble again, demanding action on “that” statement)

यावर बोलताना तृप्ती देसाई म्हणाले  कोरोना ही महाभयंकर महामारी आहे. सध्या तिसरी लाट येत आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला आहे.
 इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधीसुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे सांगून देसाई यांनी म्हटले आहे, सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना इंदुरीकर यांना बोलविले जाते. तेथे गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत. म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. यापूर्वीसुद्धा इंदुरीकर यांच्या करोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.
Related Posts
1 of 1,640
हिंमत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल,असेही देसाई यांनी म्हटले आहे.(Indurikar Maharaj in trouble again, demanding action on “that” statement)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: