भारताचा इंग्लंडवर ३१७ धावांनी शानदार विजय ,मालिकेत १-१ ची बरोबरी 

0 20

चेन्नई –  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटी मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केला आहे. चेन्नई येथे हा कसोटी सामना सुरू होता या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामना सुरू होण्याचे अवघ्या काही मिनिटातच भारताचे तीन महत्त्वपूर्ण विकेट इंग्लंडने घेतले होते. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि भारताच्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा …

भारतातर्फे पहिल्या डावात रोहित शर्माने १६१ धावांची खेळी केली तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेनी ६७ धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात भारताने ३२९ धावसंख्या उभारली होती. भारताचे ३२९ धावसंख्याला उत्तर देत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात फक्त १३४ धावसंख्या करू शकले. भारतातर्फे रविचंद्र अश्विन यांनी पाच तर आपला पहिला कसोटी सामना खेळणारा अक्षर पटेलने दोन आणि इशांत शर्माला दोन तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाला होता.

Related Posts
1 of 47

मोदी देश बरबाद करत आहेत त्यामुळे भाजपाला ही मोदी नको आहेत – नाना पटोले

तर आपल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने २८६ धावसंख्या केली. या डावात कर्णधार विराट कोहलीने ६२ धावसंख्या केली तर रविचंद्र अश्विनने आपला पाचवा आणि इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केला. दुसऱ्या डावात रविचंद्र अश्विनने १०६ धावसंख्या करून भारताचा विजय निश्चित केला होता .  दुसऱ्या डावात इंग्लंडला विजय साठी ४८१ धावसंख्याची आवश्यकता होती मात्र इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात १६४ धावसंख्या वर ऑल आउट झाला . भारतातर्फे अक्षर पटेलने ६० धाव देत पाच विकेट घेतले तर रविचंद्र अश्विनने ५३ धावते तीन विकेट आणि कुलदीप यादवने २५ धावा देत दोन विकेट घेतले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून या ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा

चार कसोटी सामन्यात आता १-१नी बराबरी झाली आहे. तिसरा कसोटी सामना अहमदाबाद मध्ये २४ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.  हा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: