भारतीय जवान फसला सुंदरीच्या जाळ्यात अन्.. झाला धक्कादायक खुलासा

0 468
Indian soldier caught in ISI sundari's trap

 

दिल्ली – काही  दिवसांपूर्वी  हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय लष्करातील जवान (Indian soldier) प्रदीप कुमार (Pradeep Kumar) याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे होत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या तपासात (ISI) पाकिस्तानी हनी गर्लचे अनेक फोटो आणि व्हिडिओही (Photos and videos) समोर आले आहेत.
Related Posts
1 of 2,190

 

बॉलीवूडच्या थीमवर इंस्टाग्रामवर रील बनवून ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची एजंट भारतीय जवानांना पाठवत होते. असेच व्हिडिओ तिने प्रदीप कुमार देखील पाठवले होते. त्याच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या फोटो आणि व्हिडिओंवरून याची पुष्टी झाली आहे.

 

ISI एजंट मुलगी कधी रिया शर्मा, कधी लीना शर्मा तर कधी हरलीन कौर बनून इंस्टाग्रामवर सक्रिय असायची. ती अनेक सैनिकांना वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे व्हिडिओ पाठवत असे. आंघोळीपासून ते गाण्यापर्यंतचा व्हिडिओ आणि फोटो तिने भारतीय लष्कराच्या जवानाला पाठवले आहे. अटक केलेल्या जवानाला तिने लग्नाचे आश्वासन दिले होते. दर महिन्याला भेटण्याचे आश्वासन दिले. जवानाला भेटण्यासाठी दिल्लीलाही बोलावले. धक्कादायक बाब म्हणजे असे फोटो आणि व्हिडिओ पाठवून पाकिस्तानी तरुणींनी भारतीय लष्कराच्या अनेक जवानांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

 

लष्कराचा जवान पाक महिला एजंटला गोपनीय कागदपत्रे पाठवत असे. खरं तर, मे महिन्यात गुप्तचरांच्या देखरेखीखाली हे समोर आले होते की लष्कराचा जवान प्रदीप कुमार सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी महिला एजंटच्या सतत संपर्कात आहे आणि महत्त्वाची माहिती शेअर करत आहे. यानंतर जवानावर कारवाई करत 18 मे रोजी दुपारी कोठडीत चौकशी सुरू करण्यात आली, तेव्हापासून नवनवीन खुलासे होत आहेत.

राजस्थान इंटेलिजन्सचे डीजी उमेश मिश्रा यांनी सांगितले होते की, 24 वर्षीय प्रदीप कुमार हा कृष्णा नगर गंगा कालवा उत्तराखंडचा रहिवासी आहे. 3 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला होता. प्रशिक्षणानंतर प्रदीपची पहिली पोस्टिंग गनर या पदावर झाली. त्यानंतर आरोपीची पोस्टिंग अत्यंत संवेदनशील रेजिमेंट 881 जोधपूरमध्ये करण्यात आली.

 

तपासात असे आढळून आले की, या पाकिस्तानी तरुणीने आपले नाव बदलून सुमारे 6-7 महिन्यांपूर्वी जवानाच्या मोबाईलवर कॉल केला, त्यानंतर दोघांचे व्हॉट्सअॅप, चॅट, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले आणि अखेर जवान जाळ्यात अडकला.  तरुणीने स्वत: ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असल्याचे सांगितले आणि ती बंगळुरू येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. प्रदीप कुमार यांना दिल्लीत भेटून लग्न करण्याच्या बहाण्याने एजंटने लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रांची छायाचित्रे मागायला सुरुवात केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: