भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा शहर कार्यकारणी जाहीर

0 99
Indian Buddhist Congress announces Shrigonda city executive
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
श्रीगोंदा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन  श्रीगोंदा येथे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेची मीटिंग श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजू ओहोळ यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली .
Related Posts
1 of 2,326
यामध्ये तालुक्यात चालू असलेल्या धार्मिक व सांस्कृतिक सामाजिक कार्य करत असलेल्या उपस्तीथ असलेल्या  सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. धम्म कार्य गतिमान करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी केलेला त्याग व त्यांच्या निधनानंतर यशवंतराव आंबेडकरांचे कार्य.राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांचे कार्य विशद करून  श्रीगोंदा शहर कार्यकारणी ची निवड एक मताने करण्यात आली .
शहर अध्यक्ष , जुगल जीवजीराव घोडके,उपाध्यक्ष विशाल रवींद्र घोडके, सरचिटणीस तुषार अशोक घोडके ,कोशाध्यक्ष रावसाहेब हरिभाऊ घोडके सचिव ,युवराज केशवराव घोडके यांची निवड करण्यात आली यावेळी ,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव सतीश ओहोळ सर परशुराम घोडके साहिल घोडके तुषार जगताप योगेश घोडके मयूर घोडके  इ.मान्यवर उस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गोरख घोडके यांनी केले व आभार ,नवनाथ रामफळे यांनी  मानले. (Indian Buddhist Congress announces Shrigonda city executive)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: