अशरफ गनी यांना भारताने आश्रय दिला पाहिजे – भाजपा खासदार

0 235

नवी मुंबई –  अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये निर्माण झालेल्या राजकीय भूकंपात अफगाणिस्थानचे राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani ) यांनी देश सोडून संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये आश्रय घेतला आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान (Taliban) आता आपली सत्ता प्रस्थापित करणार असून राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यावरही कारवाईचे त्यांनी संकेत दिले आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (MP Subramaniam Swamy) यांनी भारताने अशरफ गनी यांना आश्रय दिला पाहिजे असा विधान केला आहे.  (India should give shelter to Ashraf Ghani – BJP MP)

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबद्दल बोलताना एक ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि भारताने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती डॉ.अशरफ गनी यांना येथे राहण्याचे आमंत्रण द्यावे. ते तुलनेने उच्च शिक्षित आहेत आणि तालिबानने आधुनिक अमेरिकी शस्त्रास्त्रांसह पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसखोरी केली तर ते भारताला मदत करु शकतात, असे खासदाराने सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

Related Posts
1 of 1,640

“हा” निर्णय घेत तालिबान ने दिला भारताला मोठा धक्का ……..

 सध्या राष्ट्रपती अशरफ गनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून पळून गेले आहेत.काबूल हे राजधानीचे शहर तालिबानने काबीज केल्यानंतर आपण रक्तपात टाळण्यासाठी रविवारीच देश सोडला असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. (India should give shelter to Ashraf Ghani – BJP MP)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: