देशमुखवस्ती शाळेत स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी रॅली

श्रीगोंदा – तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील देशमुखवस्ती आदर्श शाळेत स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेज, श्रीगोंदा तर्फे भारताच्या स्वातंत्र्याचा 75व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद कॉलेज चे प्राध्यापक डॉ. पंकज मोरे यांनी आरोग्य व स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद आयुर्वेद कॉलेज मार्फत प्राध्यापक डॉ. पंकज मोरे,नितीन मोटे पा., डॉ. वैभव धबडगे, डॉ. अनुराग गमरे, डॉ. सन्मित देठे, डॉ. वैष्णवी जाधव, डॉ. प्रज्ञा धसाडे तसेच देशमुखवस्ती आदर्श शाळेचे मुख्याध्यापक रामदास ठाकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव सोमवंशी व मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर गुणवरे हे उपस्थित होते.