IND vs SA, भारत विरुद्ध होणाऱ्या ‘कसोटी’ साठी अफ्रीकाने केली संघाची घोषणा

0 222

 नवी मुंबई –   भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी (Three Test matches series) दक्षिण आफ्रिका (South Africa) ने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात स्टार गोलंदाज डिओन ऑलिव्हरचे (Dion Olivier) पुन्हा राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे.  ऑलिव्हरने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 51 बळी घेतले आहेत.  संघाचे नेतृत्व डीन एल्गर (Dean Elgar) करणार आहे तर टेम्बा बौमा संघाचा उपकर्णधार आहे. २६ डिसेंबर पासून मालिकेची सुरुवात होणार आहे.  अफ्रीकाने 21 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. (IND vs SA, Africa announces squad for ‘Test’ against India)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.  हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळली जाईल. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तीनही सामने खेळवले जाणार आहेत.
Related Posts
1 of 65

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन या दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मगालाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी एक एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय रिकेल्टन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो रबाडा, एनरिक नोरखिया ​​आणि केशव महाराज या त्रिकुटाकडे असेल. त्याचबरोबर कर्णधार एल्गर, डेकॉक, मार्कराम फलंदाजीत जोर देताना दिसणार आहेत.  (IND vs SA, Africa announces squad for ‘Test’ against India)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: