IND vs BAN: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू संघातून बाहेर

0 22

 

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला आहे.

 

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या हाताला ही दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही.

 

Related Posts
1 of 2,487

ही मालिका 4 डिसेंबरपासून आहे
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 4 डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून सुरुवात होत आहे. ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर उभय संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

 

यानंतर दुसरा एकदिवसीय सामनाही ढाका येथे 7 डिसेंबर रोजी होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 10 डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: