तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार

0 492

अहमदनगर –   मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर पारनेर तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची तडकाफडकी ने जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. विभागीय चौकशी अंतर्गत दोषी आढळल्याने ही बदली झाली आहे. तर दुसरीकडे तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी तक्रार केल्याने आधीच अडचणीत असलेल्या ज्योती देवरे यांच्या पुन्हा एकदा अडचणीत आणखी भर पडली आहे.

अॅडव्होकेट असीम सरोदे (Advocate Asim Sarode)  यांनी यावेळी DNA मराठीशी बोलताना  ज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरे नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी बोलताना दिली. तसेच ही तक्रार फक्त तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात नसून आपल्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांविरोधात असल्याची सुद्धा यावेळी त्यांनी नमूद केले.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

बदली का
तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य महिला आयोगाकडे पारनेरच्या लोकप्रतिनिधींकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली होती तसेच जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला होता त्यानुसार देवरे यांनी केलेली तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही.

Related Posts
1 of 1,603

तर दुसरीकडे तहसीलदार देवरे यांच्याविरुद्ध अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांनी महसूल मंत्र्याकडे केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत देवरे यांनी कामात गंभीर स्वरूपाचे अनियमितता केल्याचे तसेच अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्याचे आढळून आले आहे . त्यांच्यावर हा ठपका ठेवून कारवाई करण्याच्या अहवाल शासनास पाठविण्यात आला होता. त्यानुसार त्यांना दोषी ठरवत महाराष्ट्र शासकीय बदल्यांचे अधिनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 4(5) सार्वजनिक सेवेच्या हितार्थ त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

संकटात जिल्हा वाऱ्यावर , मंत्रीपद पक्षासाठी की जनतेसाठी ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: