चिंतेत वाढ: कोरोनाप्रमाणेच monkeypox घेणार महामारीचं रूप?; WHO ने दिला ‘हा’ उत्तर

0 265
Monkeypox spread by sex ?; A warning from a health expert, he said.

 

मुंबई – कोरोना (Corona Virus) महामारी नंतर संपूर्ण जगाला पुन्हा एकदा मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूने चिंतेत टाकला आहे. आता पर्यंत युरोपातील 15 हून अधिक देशांमध्ये या विषाणूचे शंभरहून अधिक रूग्ण समोर आली आहे. त्यामूळे पुन्हा एकदा जगावर मोठा संकट येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळेच हा विषाणू लवकरच कोरोनाप्रमाणे महामारीचे रूप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मंकीपॉक्स तज्ज्ञ डॉ. रोजमंड लुईस यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्सचा आजार महामारीचं रूप घेईल, असं त्यांना वाटत नाही, परंतु शास्त्रज्ञांना अद्याप मंकीपॉक्सबद्दल फारशी माहिती नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

 

ते म्हणाले की हा व्हायरस लोकांमध्ये नेमका कसा पसरतोय हे आतापर्यंत आम्हाला माहिती नाही. डॉ. रोजमंड लुईस म्हणाले की, हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे की स्मॉलपॉक्ससाठी लसीकरण मोहीम अनेक दशकांपूर्वी सुरू करण्यात आली होती, परंतु ती गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. लसीकरण बंद केल्यामुळे आता हा आजार पसरत आहे का? असा प्रश्नही आहेच.

 

Related Posts
1 of 2,216

मंकीपॉक्सवर आयोजित एका चर्चासत्रात डॉ. रोजमंड म्हणाले की, यावर विशेष जोर द्यावा लागेल की बहुतेक देशांमध्ये जी प्रकरणं समोर येत आहेत ती सहसा समलिंगी, उभयलिंगी, पुरुष आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे लोक यांच्यातच आढळत आहेत. हे कशामुळं होत आहे याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणाले की याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण याआधी अशी प्रकरणं आढळली नव्हती ज्यात समलिंगी किंवा उभयलिंगींना हा आजार झाला आहे.

 

 

हा आजार केवळ समलिंगी किंवा उभयलिंगींमध्येच होतो, असं नाही, असा इशाराही डॉ. रोजमंड यांनी दिला. प्रत्येकाला हा आजार होऊ शकतो. दुसऱ्या एका तज्ज्ञाने सांगितलं की, हा निव्वळ योगायोग असू शकतो की हा आजार पहिल्यांदा गे आणि बायसेक्शुअलमध्ये दिसला. पण लवकरच त्याचा संसर्ग इतर लोकांनाही होऊ लागला. जर त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर तो कोणत्याही माणसामध्ये पसरू शकतो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: