चिंतेत वाढ! देशात एकाच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद तर …

0 116
 मुंबई –  देशातील कोरोना (Corona virus) संसर्गाचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. देशात  गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे 2 लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण (patients) आढळले असून 84 हजार 825 लोक बरे झाले आहेत. यादरम्यान 380 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा वेगवान झाला आहे.(Increased anxiety! If more than two lakh patients are registered in a single day in the country …)
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सक्रिय प्रकरणांची संख्या 11 लाख (11,17,531) च्या वर गेली आहे. बुधवारच्या तुलनेत आज म्हणजेच गुरुवारी देशात 52,697 अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बुधवारी कोरोना विषाणूची 1,94,720 प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत सक्रिय प्रकरणांमध्ये 1,62,212 ची वाढ झाली आहे. बुधवारी 9,55,319 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली. गुरुवारी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27 हजार 561 रुग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जून 2021 नंतर एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आता पर्यंत कोरोनामुळे 265 पोलिसांचे प्राण गेले आहेत, त्यापैकी 126 मृत्यू मुंबई पोलिसांत झाले आहेत. राज्य पोलिसांत अजूनही 2 हजार 145 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
Related Posts
1 of 1,622
देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठका सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात येणार असून त्यावरील उपाययोजनांवरही चर्चा करण्यात येणार आहे. या सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे देशातील ३०० जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक झाले आहे.(Increased anxiety! If more than two lakh patients are registered in a single day in the country …)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: