व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ , जाणून घ्या नवीन दर

0 166
नवी मुंबई – देशात एकीकडे पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) ची दरवाढ सुरुच असताना आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) च्या दरात २६६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती १२०० रुपयांच्या आसपास होत्या. २०२१ या वर्षात दर महिन्याला सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. २०२१ च्या जानेवारी महिन्यात १ हजार ४२२ रुपयांना मिळणारा सिलिंडर नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबई शहरात १ हजार ९५० रुपयांवर गेला आहे. तर काही राज्यांमध्ये सिलिंडरचा दर दोन हजारांच्या वर गेला आहे.(Increase in the price of commercial gas cylinders, learn new rates)

न्यूझीलंड विरुद्ध रोहित नाही तर “हा ” खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

या दरवाढीमुळे देशातील हॉटेल व्यवसाय आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आधारीत असलेल्या उद्योगांवर संकट ओढवले आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर आता कुठे हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योग स्थिरस्थावर होत असताना सिलिंडरच्या महागाईमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे.(Increase in the price of commercial gas cylinders, learn new rates)
Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: