‘त्या’ प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिला मोठा निर्णय

ठाणे क्राईम ब्रांचने (crime branch) केतकी चितळे यांची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केतकी चितळेकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.
नेमकं प्रकरण काय ?
फेसबूक पोस्टमध्ये अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केला होता. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर केतकीला नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली.