DNA मराठी

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात पारनेरला गुन्हा दाखल

0 384
Increase in the difficulty of actress Ketaki Chitale ; Parner charged in 'that' case

 

अहमदनगर –  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Increase in the difficulty of actress Ketaki Chitale ; Parner charged in ‘that’ case)

Related Posts
1 of 2,482
यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात देखील अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात  संजीव भोर यांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच  ठाणे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपी केतकी चितळेला जामीन मंजूर होण्याआधीच पारनेर पोलीसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

 

 

शरद पवार  सारख्या एखाद्या जनमान्य नेतृत्वाच्या मृत्यूची आस बाळगणे, त्यांनी जीवघेण्या गंभीर आजारावर केलेली मात हे खरे तर अनेकांना प्रेरणादायी आहे,मात्र हे नाकारून त्यावर व्यंग करणे यापेक्षा नीचपणा दुसरा नाही.स्वत:ला श्रेष्ठ, उच्च वर्णिय म्हणवणारी माणसं विचाराने किती खुजी असतात हे केतकी चितळे या विकृतीला लोकशाही मार्गाने धडा शिकविण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे.पारनेर पोलीसांचे आभार व त्यांच्याकडून पुढील तत्पर कारवाईची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी दिली.   (Increase in the difficulty of actress Ketaki Chitale ; Parner charged in ‘that’ case)

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: