DNA मराठी

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0 161
Increase in difficulty of Gunaratna Sadavarte; 14 days judicial custody
मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी हल्ला केल्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची आज दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरात यांनी पोलिसांची बाजू मांडली.
Related Posts
1 of 2,482
यावेळी त्यांनी सदावर्तेंची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील या दोन आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात आज अनेक धक्कादायक खुलासे केले.

सदावर्ते यांनी मुद्द्यामून कर्मचाऱ्यांकडून छोटी रक्कम गोळा करुन दोन कोटी रुपये जमवले. ती रक्कम त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. पण आता जयश्री पाटील या फरार आहेत, असा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे. संबंधित प्रकरण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ल्याच्या प्रकरणावरुन आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेला वळत आहे, असंही सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं.

पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांटी सरकारी वकिलांनी सात दिवसांची कोठडी मागितली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सुनावणीच्या सुरुवातीलाच अटकेत असलेल्यांमधील गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी या तिघांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली.

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टॅरेसवर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते अडीच वाजेपर्यंत मिटींग झाली होती. यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती. या प्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार आहेत. जयश्री पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नागपूरची व्यक्ती मुंबईत होती

आंदोलनाच्या ठिकाणी होती, ज्या दिवशी आंदोलन झाले ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हॅन्डल करत होती. नागपूरच्या व्यक्तीने अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्व्हर ओक जवळील गार्डनमध्ये लोकांना यायला सांगितले. नागपूरच्या व्यक्तीला अभिषेक पाटीलने नंतर फोन केला अणि लोकं गार्डनमध्ये जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर नागपूरच्या व्यक्तीने मेसेज केला की, पत्रकारांना पाठवा. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे हल्ल्याआधी त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरा समोर भेटले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: