सदावर्तें यांच्या पुन्हा अडचणीत वाढ; आता मराठा समाजाकडून गंभीर आरोप

0 284
Consolation to Gunaratna Sadavarten; In that case, the High Court granted pre-arrest bail

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

Related Posts
1 of 2,357

कोल्हापूर – काही एस टी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानी हल्ला केला होता. यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली होती. सध्या सदावर्ते तुरुंगात असून अद्याप त्यांना जामीन मिळालेला नाही. यातच आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे मराठा समाजाला अद्यापही मराठा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. याच प्रकरणावरुन आता मराठा समाजही आक्रमक होताना दिसत आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आता मराठा समाजाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिलीप पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केले, असा आरोप दिलीप पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केल्याचा आरोप या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. तसेच सदावर्तेंनी न्यायमूर्तींच्या विरोधातही अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे अन्यथा ते पुरावे नष्ट करतील, अशी भीती तक्रारदार दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सदावर्तेंच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी 74 हजार 400 रुपये अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे स्वीकारले होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: