ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ; काँग्रेस आमदार नाराज; लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटणार

0 213
Increase in congressional difficulty; State President resigns; Many churches abound

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –  राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (MVA) सुरु असलेला वाद पुन्हा एकदा समोर आल्याने ठाकरे सरकारवर संकट (Thackeray government) उभा राहिला आहे. राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असणारी काँग्रेसच्या (Congress) २५ आमदारांनी मोठा निर्णय घेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चना उधाण आले आहे. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्ष वाया गेल्याची भावना या आमदारांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर या आमदारांनी सोनिया गांधींकडे तक्रार करायचं ठरवंलं आहे.(Increase in difficulties of Thackeray government; Congress MLAs angry)

Related Posts
1 of 2,358

त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सत्तेत असूनही आमची गेली अडीच वर्ष आपल्याच मंत्र्यांमुळे वाया गेली असल्याची व्यथा ते दिल्लीत मांडणार आहेत.

मात्र समोर आलेल्या माहितीनुसार सर्व काँग्रेस आमदारांची नाराजी ही काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्यांविरोधात आहे. नाराज काँग्रेस आमदारांचा आकडा हा 25 च्या वरती असल्याच सांगितलं जात आहे. येत्या तीन तारखेला एका विशेष ट्रेनिंगसाठी ही सर्व मंडळी दिल्लीला पोहोचणार आहेत. त्यामुळे तिथे त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना भेटायची वेळ मागितली असल्याची माहिती मिळत आहे.  (Increase in difficulties of Thackeray government; Congress MLAs angry)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: