शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ; राज्यात पुढच्या पाच दिवस ‘या’ भागात अवकाळी पाऊस

0 328
Rain with strong winds in 'this' districts of the state; Meteorological Department warning

 प्रतिनिधी – DNA मराठी टीम

पुणे – भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) राज्यात पुढच्या पाच दिवस तीव्र हवामान सक्रिय राहणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आज पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे. (Increase in difficulties of farmers; Untimely rain in ‘this’ area for next five days in the state)

रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड-परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही अधिक असू शकेल.

Related Posts
1 of 2,195

अकोला, बुलडाणा येथे मंगळवार ते गुरुवार तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Increase in difficulties of farmers; Untimely rain in ‘this’ area for next five days in the state)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: