
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आधीच अडचणीत सापडलेल्या सीएसके च्या अडचणीत आणखी भर झाली आहे. 14 कोटी रुपये देऊन संघात सहभागी केलेल्या भारताचा जलद गोलंदाज दीपक चहरला (Deepak chahar) दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या स्नायूंना दुखापत झाली होती. चहर दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत होता आणि एप्रिलच्या अखेरीस तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती. आता चहरला स्नायूंच्या दुखापतीतून सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. यावेळी त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे.
आयपीएल 2022 मध्ये CSK आता पर्यंत आपल्या चारही सामने हरला आहे. यातच दीपकला झालेल्या दुखापतीमुळे CSK च्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.चेन्नईसाठी दीपक चहर पॉवरप्लेमध्ये प्रमुख गोलंदाज होता दीपकशिवाय चेन्नईचा संघ चार सामने खेळला असून पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ दोनच बळी घेता आले आहेत.
चेन्नईसाठी पॉवरप्लेमध्ये चहरचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये 58 डावांमध्ये 42 विकेट घेतल्या आहेत आणि 7.61 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आहेत. याच कारणामुळे चहरला चेन्नईने मेगा लिलावात तब्बल 14 कोटी रुपयांना विकत घेतले.