अबब! शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ , आज इतक्या रुग्णांची नोंद

0 428
In the district even today, there are more than one thousand corona patients

अहमदनगर – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona patients) संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 432 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 17 जानेवारी रोजी जिल्ह्यात 929 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 522 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागात 119 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.( Increase in coronary artery disease in the district including the city, so many patients recorded today)

आज नोंद झालेल्या 1 हजार 432 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 522, नगर ग्रामीण भाग 119, राहता 113, पारनेर 109 , श्रीरामपूर 78, पाथर्डी 73 ,नेवासा 52, इतर जिल्ह्यातील 49 ,अकोले 48, संगमनेर 48 ,कोपरगाव 34, कर्जत 34, राहुरी 30, जामखेड 28, शेवगाव 27, श्रीगोंदा 25, मिलिटरी हॉस्पिटल 20, भिंगार कँटोन्मेंट 19 आणि इतर राज्यातील 04 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

आता फोटो एडिट करणं होणार सोपं, WhatsApp घेऊन येणार नवीन फीचर्स

Related Posts
1 of 2,066

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 374, खाजगी लॅबमध्ये 731 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 327 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.( Increase in coronary artery disease in the district including the city, so many patients recorded today)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: