देशात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्यात वाढ: राजेश टोपे यांचा सूचक विधान,म्हणाले..

0 348
Rajesh Tope's big announcement regarding health recruitment exam; Said, State Government ..

 

मुंबई – मागच्या काही महिन्यापासून देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona patients)कमी झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक निर्बंध शिथील करण्यात आले होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्ल्लीसह काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे कोरोनाबाधित वाढले आहेत. देशभरात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही चौथी लाट असल्याची देखील भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

Related Posts
1 of 2,241

परिस्थितीवर लक्ष आहे

वाढलेले रुग्ण ही चिंतेची बाब नसल्याचं नमूद करतानाच आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं राजेश टोपे म्हणाले. “आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाश्चात्य देश, युरोप, चीनमध्ये असलेली परिस्थिती जर आपल्याला जाणवली, काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत, तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, आमचं टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल”, असं राजेश टोपे म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: