साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स,अजित पवारांच्या अडचणीत वाढ ?

0 199

पुणे –  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांचे संचालक असलेल्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

कुटुंबाला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू केली आहे. ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते सर्वजण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Related Posts
1 of 1,640

हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: