नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे युवासेने च्या पहिल्याच शाखेचा उद्घाटन

0 193

अहमदनगर –  नगर तालुक्यातील टाकळी काझी (Takli Qazi) येथे  युवासेने ( Yuvasena ) च्या पहिल्याच शाखेचा उद्घाटन सोहळा जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर (Shashikant Gade ) यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा लाईट चा प्रश्न लवकरात लव कर मार्गी लावू असे ही आवाहन प्रा.शशिकांत गाडे व उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी केले.(Inauguration of the first branch of Yuvasena at Takli Qazi in Nagar taluka)

यावेळी गावातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.यामधे टाकळी काझी ते कोल्हेवाडी रस्ता मजबुतीकरणा साठी चार लक्ष व गावातील स्मशानूमी च्या मूलभूत सुवधांसाठी पाच लक्ष रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या निधीतून देण्यात आला.गावातील मातंग समाज स्मशानूमी साठी 2 लक्ष रुपयांचा निधी व मुस्लिम स्मशानूमी साठी बोअरवेल व हातपंप पंचायत समिती सदस्य प्रवीण कोकाटे यांच्या निधीतून देण्यात आला.

अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत, हिवाळी अधिवेशनासंदर्भात मोठी अपडेट

Related Posts
1 of 1,518

गावातील आश्रम शाळेसाठी बोअरवेल सभापती संदीप गुंड यांच्या निधीतून देण्यात आला.गावातील रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी आमदार बबनराव पाचपुते यांच्या निधीतून देण्यात आला.यावेळी उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले,सभापती संदीप गुंड,उपसभापती प्रवीण कोकाटे,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे,शिवसेना उपतालुका प्रमुख शंकर ढगे,सरपंच शहाजी आटोळे,उपसरपंच अविनाश पवार, ग्रां.पं.सदस्य हर्षल कांबळे,ग्रां.पं.सदस्य योगेश शेलार,ग्रां.पं.सदस्य संदीप म्हस्के,रेवजी निक्रड, अशोक ढगे,सर्व शाखा प्रमुख,गावातील ग्रामस्थ,शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी  शिवसैनिका मधे नवा जोश पाहिला मिळाला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.(Inauguration of the first branch of Yuvasena at Takli Qazi in Nagar taluka)

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: