सिध्दिबाग (कै.बाळासाहेब देशपांडे उद्यान)नूतणीकरणाचे उद्घाटन व संगीत मैफिलेचे आयोजन

अहमदनगर – शहरातील सिध्दीबाग (कै.बाळासाहेब देशपांडे उद्यानचा) कायापालट ॲड.धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतुन ओम डिजिटल या संस्थेने बीओटी तत्वावर घेऊन केला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेत व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नुतनीकरण केलेल्या उद्यानाचे उद्घाटन २० एप्रिल रोजी सायं ६.३० वा केले जाणार असून २१ एप्रिल पासुन जनतेसाठी खुले होणार आहे.
यावेळी मनपाचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे,महानगरपालिकेतील पदाधिकारी नगरसेवक तसेच अधिकारी आदी उपस्थित राहणार आहे.तसेच नूतनीकरण उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला सुर नवा ध्यास नवा फेम महाराष्ट्राची महागायिका सौ. सन्मीता धापटे- शिंदे, गायक आदेश चव्हाण तसेच गायक गिरिराज जाधव यांची संगीत सुरांची मैफिल होणार आहे.तरी सर्व नगरकरांनी संगीत मैफिलीचा आनंद घेण्यासाठी नक्की यावे असे आवाहन ओम डिजिटलच्या वतीने संजय बोगा व राहुल मुथा यांनी केला आहे.
सिध्दीबाग हे नगर मधील नागरिक आणि लहानग्यांसाठी आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. सिध्दी बागेला अनेक वर्षापूर्वी हजारो पर्यटक भेट देत असत. या उद्यानांचे गतवैभव परत आणण्यासाठी ॲड.धनंजय जाधव यांनी पुढाकर घेऊन उद्यानाचा कायापालट केला आहे. नव्या रूपातील या उद्यानात अधिक आकर्षक, अधिक मनोरंजनात्मक, अधिक माहिती मिळणार आहे.
या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गाचा आणि सभोवतालच्या विहंगम दृष्याचा अनुभव घेता येणार आहे. सुप्रसिद्ध मत्सालयाची दुरुस्ती करून त्याला नव्या आकर्षक प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली आहे. कारंजा चालू करण्यात आला असून त्याच्या बाजूकडील `आय लव्ह सिध्दीबाग सेल्फी पॉइंट, बटरफ्लाय विंग पॉइंट पर्यटकांना भुरळ पाडणार आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ, विविध झाडे, त्यावर चित्रात्मक व माहिती फलक लावले गेले आहेत. अनेक ठिकाणी प्राण्यांची प्रतिकृती आकारली गेली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, जॉगिंग ट्रॅक, एलईडी पद्धतीचे दिवे, लहान- मुलांसाठी खेळणी लावण्यात आली आहे.