आरपीआय (आ) श्रीगोंदा शहर शाखेचे उद्घाटन…

0 131
  श्रीगोंदा :-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या शहर शाखेचे उद्घाटन तसेच, शाखा फलक अनावरण व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्रीगोंदा येथे संपन्न झाला. (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) रवीदादा कांबळे, (जिल्हाध्यक्ष) सुनील साळवे, (जिल्हा उपाध्यक्ष युवक) अवि भाऊ घोडके, (तालुका उपाध्यक्ष) प्रवीण घोडके, (शहराध्यक्ष) विशाल घोडके सह पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविदादा कांबळे हे होते. तर, सूत्रसंचालन मच्छिंद्र पाटोळे व प्रस्ताविक त्रिंबक साळवेनीं केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.(Inauguration of RPI (a) Shrigonda City Branch …)

कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना (जिल्हाध्यक्ष) सुनील साळवे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे या वयातही दिवसातले अठरा-अठरा तास सामाजिक बांधिलकीचे कामं करतात. तर, आपण तरुणांनीही समाज प्रक्रियेमध्ये वेळ का देऊ नये ? असा सवाल त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला शासनकर्ती जमात व्हायला सांगितले होते. मात्र, ज्या वेळेस आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो, त्यावेळेस राखीव जागेवर आपल्याच बांधवांच्या विरोधात आपण अनेक जण एकत्रित काम करतोत. ही पद्धत चुकीची असून, सर्वांनी एकत्रित येत विचाराचा उमेदवार दिला. तर, आपला विजय होऊ शकतो. असे मत त्यांनी यावेळी नमूद केले.

मागासवर्गीय अत्याचारांच्या अनेक घटनांमध्ये आरपीआय पदाधिकारी म्हणून, सर्वात पुढे राहत पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि यापुढेही घेणार.! असेही त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित येत ही चळवळ पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. प्रत्येक भीमसैनिक, प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्ता, अनुसूचित जातीमधील प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ आहे. ही नीती तुम्ही स्वीकारा. मात्र, आपला समाज इंग्रजांच्या कुटनीतीचा वापर करणाऱ्या राजकारण्यांच्या फोडा आणि झोडा प्रक्रियेचा बळी आहे.

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Related Posts
1 of 1,463

आपल्या कार्यक्षेत्रातील नेत्याच्या पुढेपुढे करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष आरपीआय ला ताकद द्या. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्यातील अनुरेणू एवढे सूक्ष्म मतभेद आपण सोडणे गरजेचे आहे आणि एकत्र येत, गट तटाला मूठमाती देवुन, आंबेडकरी चळवळ ताकतीने पुढे नेण्यासाठी तालुक्यातील तरुणांनी पुढे यावे.! असे आवाहन यावेळेस साळवे यांनी केले.

नमूद कार्यक्रमांमध्ये बंडू तात्या जगताप, गौतम आण्णा घोडके, नंदू भाऊ ससाने, मिराताई शिंदे, संग्राम घोडके (नगरसेवक), विकास कदम (दौंड), सुनील घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे विशाल भाऊ घोडके यांनी आभार मानले.

शहर शाखेच्या फलकाचे अनावरण करतांना (जिल्हाध्यक्ष) सुनील साळवे, (जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष) बाबासाहेब भोस, (मा. नगराध्यक्ष) मनोहरदादा पोटे, (शेतकरी विकास आघाडीचे) राजेंद्र आबा मस्के, (माजी उपनगराध्यक्ष) अख्तर भाई शेख, विकास कदम, नंदू भाऊ ससाने, बाळासाहेब घोडके, शिवाजी आप्पा घोडके सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Inauguration of RPI (a) Shrigonda City Branch …)

दारू बंदीसाठी महिलांचा पुढाकार,कारवाई न झाल्यास आंदोलन करणार..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: