टाकळी कडेवळीत गावात ग्रामसभेत दारूबंदी चा ठराव एकमुखाने संमत

0 463

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी ग्रामसभेत महिलांच्या वतीने पुष्पाताई कोळेकर यांनी दारूबंदी चा प्रस्ताव मांडला त्यावेळी सर्वानुमते दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आज दि 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आज गावात ग्रामसभा घेण्यात आली होती त्यावेळी अनेक विषयावर चर्चा झाल्यानंतर महिला यांना बोलायला संधी दिली त्यावेळी पुष्पाताई कोळेकर यांनी सांगितले की दारूमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत आज लहान मुले दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसत आहेत त्यामुळे महिला मुली यांचा सुरक्षित नाहीत त्यासाठी संपूर्ण गावामध्ये दारूबंदी करण्याबाबत ग्रामसभेत मांडला त्यावर ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी जनतेकडे विचारणा केली असता गावातील सर्व ग्रामस्थांनी दारूबंदी करावी याबाबत सहमत नोंदवले त्यामुळे जनतेमधून पुष्पाताई कोळेकर यांचे कौतुक करण्यात आले.

Related Posts
1 of 1,357

या ग्रामसभेला आरोग्य विभागाचे तसेच वन विभाग, यासह सर्वच विभागाचे कर्मचारी प्रतिनिधी म्हणून हजर होते पोलीस खात्याचे पोलीस हेडकॉन्स्टबल संजय काळे यासह सरपंच रुपाली इथापे, उपसरपंच सुभाष देशमुख यांच्यासहसर्वच विभागाचे कर्मचारी प्रतिनिधी म्हणून हजर होते पोलीस खात्याचे पोलीस हेडकॉन्स्टबल संजय काळे यासह सरपंच रुपाली इथापे, उपसरपंच सुभाष देशमुख यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे माजी चेरमन बाबासाहेब इथापे, सुदाम नवले, सुरेश वाळुंज, सतीश नवले, दिलीप वाळुंज, महेंद्र वाळुंज, कल्याण वाळुंज, आदी मान्यवरमंडळी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: