“त्या “प्रकरणात छिंदम बंधूंचा जामीन अर्ज नामंजूर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 288

अहमदनगर – माजी महापौर श्रीपाद छिंदम (shripad Chhindam) आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात छिंदम बंधूंचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आहे.

छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र मदाडे व इतर ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दिल्लीगेट येथील टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दाखल केली होती. छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै रोजी दुपारी दिल्लीगेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Related Posts
1 of 1,640

तसेच त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्याती ३० हजार रूपये हिसकावून बोडखे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच टपरी जेसीबीच्या सहाय्य तोडून टाकली, अशी फिर्याद बोडखे यांनी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर छिंदमसह चौघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. येथे मात्र त्यांचे अर्ज नामंजूर झाले होते. त्यानंतर चौघांनी खंडपीठात धाव घेतली होती. येथे महेश सब्बन व राजेंद्र जमधाडे यांना अटकपूर्व जामीन मिळाल मात्र श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांचा अर्ज नामंजूर केला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाहीत – किरण काळे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: