राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खडकी अकोले, अहमदनगर चे राहुल भांगरे प्रथम

0 361

अहमदनगर  –    आदिवासी भागांमध्ये तसेच जिथे आपल्याला जमेल तिथे काम करणारी, ज्या ठिकाणी कुठलीही सोयीसुविधा नाही तिथे पोहोचणारी, आरोग्य आणि शिक्षणासोबतच तरुणांच्या रोजगार आणि महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यरत असणारी, अल्पावधीतच समाजकार्यात आपला ठसा उमटवणारी काजवा बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र तसेच तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यरत असणारे ‘इ बंडकरी मासिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात या ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या मराठी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, महाराष्ट्रातून खेडेपाड्यातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लिहीण्याचा टक्का हा तरुणांपेक्षा तरुणींचा जास्त आहे. राहुल भांगरे यांच्या निबंधाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच सुमन बगाड, रा. धामनखेल, जुन्नर यांनी द्वितीय आणि अनुराधा कोकणी, रा. नवापूर, नंदुरबार यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ बक्षिस हे दिक्षा इरणक रा. पिंपळगाव, जुन्नर व सुनील काकड रा. वसई पालघर यांनी पटकावले आहे.

विशेष उत्तेजनार्थ म्हणून मनोहर मोहरे रा. फुलवडे आंबेगाव आणि विजया पाडेकर, अकोले अहमदनगर यांच्या निबंधाची निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ही स्पर्धा राबविण्यासाठी संयोजक म्हणून प्रकाश इथापे (मोरया फायनान्स सर्व्हिसेस अहमदनगर), सागर शेंगाळ (सामाजिक कार्यकर्ते) सुनीता बुरसे मॅडम, भावका उंबरे सर तसेच संस्थेचे पदाधिकारी राम लोटे, सागर मुठे, सारीका आगाशे, निकिता घुगरकर, सपना धांडे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली होती, लिखाणासाठी कुठल्याही वयाची अट नव्हती. विजेत्या स्पर्धकांना त्यांची बक्षीसे पोस्टाने लवकरच पाठण्यात येतील, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळतील.

हे पण पहा – किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

सर्वच स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन खरं तर निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करणं हे आमच्या पर्यवेक्षकांना खूप अवघड गेलं, त्यांच्या मते खूपच विषय व्यवस्थित मांडले गेले. तरी देखील तरुणांनी जास्तीत जास्त लिखाण करून समाजासाठी व्यक्त व्हावं, अशी आमची अपेक्षा आहे.

_ दिनेश भोईर सर (सह संपादक बंडकरी मासिक)

Related Posts
1 of 1,487

संस्थेचे काम उत्तरोत्तर संस्थेच्या हितचिंतकांमुळे वाढत आहे. संस्था सदैव सामाजिक उपक्रमाद्वारे आपले समाजाशी नाळ जोडून ठेवण्यास अग्रेसर असेल. आम्ही सर्व स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन करतो. त्यांनी अश्याच प्रकारे लिखाण वाढवत जावे

प्रविण धांडे
अध्यक्ष काजवा बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र.

भाऊबीजेच्या दिवशी भावाची 5 ते 6 वार करत निर्घृण हत्या……, आरोपी फरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: