राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ११ जणांवर गुन्हा दाखल

0 299

महाबळेश्वर  –  नुकताच मुंबईतील डोंबिवली(Dombivli) परिसरात एक अल्पवयीन अल्पवयीन (minor girl) मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार( Gang rape)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या प्रकरणात पोलिसांनी २८ आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र अशीच एक घटना आता महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरात घडली आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने लहान बाळाला घरातच जन्म दिले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना  या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह नऊ जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.

पीडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवते. मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते  ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी या मुलीची घरातच प्रसुती करण्यात आली ज्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. याबाबत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांना याबाबत माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेत माहिती घेतली.

हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Related Posts
1 of 1,487

संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ शीतल जानवे यांनी विश्वासात घेत तपास सुरू केला संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात धमकावल्या व मदत केल्याप्रकरणी आणखी ११ जणांना अटक केली.हा प्रकार घडल्यानंतर नवजात मुलीला मुंबईतील चौरसिया कुटुंबाकडे सोपवण्यात आलं. या कुटुंबाला नवजात मुलगी सोपवण्यात माजी नगराध्यक्ष बावळेकर यांच्या दोन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आल्यामुळे त्यांच्यावरही अत्याचार आणि आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण – आणखी दोन आरोपींना अटक

या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही याची काळजी आरोपींनी घेतली होती. या प्रकरणी मुलीला दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा वापर न केल्यामुळे सहभागी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही बावळेकर यांचा मुलगा योगेशवर व्हॉट्स अपवर अश्लील चित्रफीत व्हायरल करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: