
मुंबई पोलिसात कार्यरत आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकू लागली होती. त्यानंतर त्यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी सेशन कोर्टात (Sessions Court) धाव घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात असे म्हंटले होते की यापूर्वीच्या एफआयआरमध्ये त्यांच नाव नव्हते आणि पोलिस ठाण्याच्या पातळीवर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात होते याची त्यांना माहिती नव्हती. त्रिपाठी यांच्या याचिकेवर आता 23 तारखेला कोर्टात सुनावणी होणार असून त्यानंतर त्रिपाठी यांना अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही, याचा निर्णय कोर्ट घेऊ शकतं.