देशात मागच्या चोवीस तासांत ३८ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण करोनामुक्त…

0
 नवी दिल्ली –  देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी जास्त होताना दिसत आहे . देशातील अनेक राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही . देशात आता पण  दररोज ३५ ते ४५ हजार दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. मागच्या चोवीस तासात देशात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३८ हजार १६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २१ हजार ६६५ वर पोहोचली आहे.
तर दुसरीकडे मागच्या चोवीस तासात देशात ३८ हजार ६६० रुग्ण करोनामुक्त झालेआहे . त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची संख्या आता तीन कोटी तीन लाख ८ हजार ४५६ झाली आहे. तर देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.३२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.देशात  मागच्या चोवीस तासात   ४९९ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या मृतांचा आकडा आता ४ लाख १४ हजार १०८ वर पोहोचला आहे. तर देशाचा मृत्यूदर मात्र १.३३ टक्क्यांवर स्थिर आहे.

Related Posts
1 of 1,153

मनोज ठवकर मृत्यू प्रकरण- अखेर पोलीस उपनिरीक्षकासह तिघे कर्मचारी निलंबित

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. काल दिवसभरात देशातल्या १३ लाख ६३ हजार १२३ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख १३ हजार ४५६ आहे तर ४ लाख ४९ हजार ६६७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे आता देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ वर पोहोचली आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वृद्धेचे घर पाडून केले बेसहारा , चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: