किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात: गृहखात्यानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता ..

0 366
In the Kirit Somaiya attack case: Home Ministry took a big decision; Now ..
दिल्ली –   माजी खासदार आणि भारतीय जनता (BJP) पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांनी आता पर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. आता याच प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातल्या सीसीटीव्हीची (CCTV) तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (In the Kirit Somaiya attack case: Home Ministry took a big decision; Now ..)

या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी गृहखात्याकडून केली जाणार आहे. किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरंच संबंधित हल्ल्यातून झाली की नाही याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे . व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जखमेबद्दल पोलीस खात्याला शंका असल्याचे देखील बोलले जात आहे.

Related Posts
1 of 2,357

प्रकरण काय ?

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला किरीट सोमय्या गेले असता यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती, असा दावा शिवसैनिकांनी केला. (In the Kirit Somaiya attack case: Home Ministry took a big decision; Now ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: