शेवटी विजय सत्याचाच होतो निलेश यांनी दिली “त्या” प्रकरणावर प्रतिक्रिया

0 470
श्रीगोंदा   :-   दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने अ.भा महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  व माजी खासदार मा समीर भाऊ भुजबळ यांना सन 2016 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्र सदनात घोटाळा झाला असा आरोप करून ईडीच्या चौकशीच्या नावाणे ना. छगन भुजबळ साहेब व समीर भाऊ भुजबळ यांना अटक करून मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात ना छगन भुजबळ साहेब व समीर भाऊ भुजबळ यांना माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या निकालाने हे सिद्ध झाले आहे की सदर आरोप व अटक ही राजकीय आकस  व केवळ ओ.बी.सी ची देश पातळीवर मोट बांधत आहेत यामुळे झाली. न्याय देवतेवर विश्वास असल्याने शेवटी सत्यमेव जयते. या निकालाचा आनंदोत्सव घारगाव येथे पारनेर तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या समवेत करण्यात आला  यावेळी समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतिशबाजी व एकमेकांना पेढे भरवून व्यक्त करण्यात आली.
Related Posts
1 of 1,517
या प्रसंगी भुजबळ साहेब सोशल मीडिया अध्यक्ष संकेत खामकर रमेश शिंदे मनीषा खामकर सोमेश शिंदे विजय काळाने अक्षय खोमणे  निखिल क्षीरसागर. नवनाथ इंगळे गोपीनाथ खेत्रे शिवाजी खेडकर यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: