नारायण राणे प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

0 420
 नवी मुंबई –   केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या नंतर महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या प्रकरणात बोलताना नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. (In the case of Narayan Rane, Revenue Minister Balasaheb Thorat said)
बाळासाहेब थोरात म्हणाले, कालची जी घटना आहे, ती आपण पाहिलं तर तशी दुर्दैवी वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात हे आहे की एक संस्कृती आहे, एकामेकांचा सन्मान करण्याची विरोधी पक्षात असलात तरी. टीका हा एक अपरिहार्य भाग असतो, टीका करावी लागते, बोलावं लागतं. परंतु त्याचा स्तर कोणता असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने, नारायण राणे जे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याला टीका देखील म्हणता येत नाही. तिला टीका म्हणणं देखील योग्य नाही. त्यातून त्यांनी जो शब्द वापरला, तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व हे मुख्यमंत्री करत असतात, तो मानबिंदू असतो, अस्मिता असते, कुणीही मुख्यमंत्री असो. त्यांच्याबाबतीत असा शब्द वापरणं तर अतिशय चुकीचं होतं. म्हणून माझ्या मते जे काही घडलंय याबाबत आम्ही निषेध करतो आहोत, त्या वाक्याचा, नारायण राणे यांचा. त्यामुळे त्यांना अखेर कारवाईला सामोरं जावं लागलं.

तसेच, ही द्वेष पूर्ण कारवाई म्हणता येत नाही, ती कायद्याची कारवाई आहे. द्वेषाचं राजकारण असू नये भाजपा जर याचं समर्थन करत असेल, तर भाजपाच्या मंत्र्यांची जी भाषणं विविध ठिकाणी सुरू आहेत, ते पाहता कुठतरी त्यांच्या मनात नैराश्य आलेलं आहे, परिणामी ते नैराश्यातून अशाप्रकारची भाषा करत आहेत. असं दिसून येत आहेत. केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे यांनी देखील ज्या प्रकारे भाषण केलेलं आहे, ते देखील महाराष्ट्राच्या संस्कृतीचं नाही.” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलून दाखवलं.

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

पुढे बोलताना थोरात म्हणाले की  या कारवाईचा कोणताही संबंध लावण्याचं कारण नाही. चुकीचं कोणी बोललं, वागलं तर कारवाई होणारचं. हे जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा आम्हाला एकप्रकारे ठीकही वाटलं होतं, की राज्याचे चार प्रश्न सोडवण्यासाठी यांची मदत होईल. महाराष्ट्राच्या जनेतेच प्रश्न सोडवता येईल, आपले अनेक गाऱ्हाणे केंद्राकडे आहेत की जे सुटणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांची मदत होईल, हे त्यांनी केलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मात्र ते सोडून दिलं…आणि जन आशीर्वाद यात्रा.. आशीर्वाद मागायचा अधिकार सगळ्यांना आहे, त्या निमित्त ते जे वक्तव्य करत आहेत, ती मात्र दुर्दैवी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यानी ते पाहावं. केंद्राकडून सोडवून घ्यावेत आणि खुशाल आशीर्वाद घ्यावेत. असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.(In the case of Narayan Rane, Revenue Minister Balasaheb Thorat said)

सावधान ! कोरोनाचा नवीन सुपर व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक 

Related Posts
1 of 1,640
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: