‘या’ तालुक्यातील दोन सहकारी संस्था यांच्या ताळेबंद मध्ये हजारो रुपयाचे निवडणूक येणे बाकी

0 34

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील दोन विवीध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ताळेबंद मध्ये अनेक वर्षांपासून निवडणूक येणे बाकी दिसत आहे त्यामुळे निवडणूक प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत सर्व हिशोब प्राधिकरण करून पूर्ण करण्यात आले आहेत त्यामुळे त्यावेळी असलेल्या निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी या रकमेचे नेमके केले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

श्रीगोंदा तालुक्यातील रुईखेल आणि खांडगाव येथील मागील पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक प्राधिकरण यांनी त्यांचेकडे निवडणूक खर्च करण्यासाठी संस्थांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली ती रक्कम निवडणूक प्राधिकरण यांच्या खात्यात जमा करण्यात आली निवडणूक पार पडली आणि निवडणूक खर्च सादर केल्यानंतर निवडणूक प्राधिकरण यांचेकडून ७० हजाराच्या आसपास रक्कम संस्थेला निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जमा करण्यासाठी देण्यात आले मात्र त्यावेळेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही रक्कम संस्थेकडे जमा केलीच नाही त्यामुळे दोन्ही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ताळेबंद मध्ये निवडणूक येणे म्हणून रक्कम दिसत आहे.

याबाबत सहाय्यक निबंधक यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता त्यांनी अनेक वर्षाचे ताळेबंद तपासले असता सरासरी ७० हजाराच्या आसपास रक्कम निवडणूक येणे म्हणून दिसत आहे त्यामुळे निवडणूक प्राधिकरण यांनी निवडणूक खर्च वगळून दिलेली रक्कम नेमकी कोणाकडे आहे याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र अजून किती घोटाळे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Posts
1 of 2,208

हा सर्व सहाय्यक निबंधक कार्यालयाचा विषय – पुरी (जिल्हा निबंधक )
विविध सहकारी सोसायटीच्या ताळेबंद मध्ये निवडणूक येणे हि रक्कम दिसत असेल तर याबाबत सहाय्यक निबंधक यांनी याचे उत्तर दिले पाहिजेत तसेच त्यावेळी कोण निवडणूक निर्णायक अधिकारी कोण होते हे शोधून त्याचेकडून खुलासा घ्यावा असेही जिल्हा निबंधक पुरी यांनी बोलताना सांगितले

तुम्ही नगर ला आल्यावर भेट घ्या ?
श्रीगोंदा तालुक्यातील निवडणूक खर्चाबाबत जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधी याना सांगितले कि तुम्ही नगरला आल्यावर तुम्हाला भेटतो आणि विषय संपवून टाकू असे सांगितले त्यामुळे हे महाशय नेमका कोणाचा आणि कश्याचा विषय संपवणार आहेत हे चित्र काही दिवसातच जनतेच्या समोर येईल असेही सज्ञान नागरिकांचे मत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: