
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे.त्यामुळे सध्या राज्यात राजकीय पारा चांगलाच तापला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आव्हाड यांना टोला लावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा थेट उल्लेख न करता ट्विटरवरुन अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है. ये डर होना जरुरी है!, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. या ट्विटमध्ये त्यांनी ईडी असा हॅशटॅग ही वापरला आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
मी काही चुका केलेल्या नाहीत. परंतु वरच्या टेपिंगमध्ये वगैरे काही चुका असतील तर मला कल्पना नाही. कोणी बोलो न बोलो पण भीती ही माणसाला खात असते, हे मी अगदी स्पष्टपणाने बोलतो. रात्री जर तीन वाजता दारावर टकटक जरी झालं तरी हार्टअॅटॅक येण्याच्याच शक्यता असतात. कोण कोणाच्या घरात घुसेल हे ध्यानीमनीही नाही. यात सर्वाधिक हाल हे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो त्यांचेच होतात. माझ्या मुलीचा राजकारणाशी काही संबंध नाही. पण ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. तिला जर उद्या नुसते बोलावले तरी ती आत्महत्या करेल. त्यांना असल्या सवयी नाही, ते फ्री बर्ड्स आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.