
मुंबई – देशात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, “धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी आहे.”
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर लावलेले सुमारे 11 हजार बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. याशिवाय 35 हजारांहून अधिक लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या 2018 च्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत पोलीस स्टेशन स्तरावर धार्मिक नेते आणि देवस्थान समित्यांच्या 40 हजार बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये परस्पर समन्वयातून धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले 10,923 बेकायदेशीर ध्वनिक्षेपक काढून टाकण्यात आले असून 35,221 ध्वनी मानकांनुसार निश्चित करण्यात आले आहेत.
राज ठाकरेंनी मशिदीतून लाऊडस्पीकर हटवण्याचा दिला इशारा राज ठाकरे यांनी 17 एप्रिल रोजी निवेदन देताना नमाज अदा करण्यास कोणाचाही विरोध नसल्याचे म्हटले होते. पण जर तुम्ही ते लाऊडस्पीकरवर करत असाल तर त्यासाठी आम्ही लाऊडस्पीकरचा वापर होऊ देणार नाही. कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही हे मुस्लिमांनी समजून घेतले पाहिजे. 3 मे नंतर बघेन काय करायचं ते. असं इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ३ मे रोजी ‘महा आरती’ करणार आहेत
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरातील त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये ‘महा आरती’ करणार आहेत. लाऊडस्पीकरद्वारे ही आरती होणार आहे.