श्रीगोंदयात पोलिस चोर तो चोर पण गोचीड बनून झालाय शिरजोर !

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) गुटखा कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतली खरी मात्र या प्रकरणात पोलीसच गुटखा चोर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या कारामतीदार पोलिसांवर नेमकी कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कर्नाटक येथून दिनांक सहा एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गुटका भरून 12 टायर चा ट्रक श्रीगोंदा साठी रवाना झाला तो ट्रक श्रीगोंद्यात आल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाणे च्या दोन पोलिसांनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून तो बारा टायर ट्रक लुटला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर लिंपणगाव रोडवरील एका हॉटेलच्या परिसरात तो लुटलेला माल दोन पांढऱ्या पिकअप च्या सहाय्याने पोलिसांनी तालुक्यात आपल्या साथीदारांसोबत वितरण करण्याचे ठरविले मात्र साथीदार असणारे एकूण 18 जण आणि दोन पोलिस असे मिळून एक एकूण वीस जण यामध्ये झाले.
सर्वांचा वाटपावरून गोंधळ झाला व त्यातील एका व्यक्तीने मध्यरात्री अकराच्या सुमारास एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला विचारले की साहेबांचा सगळे व्यवस्थित आहे का असेल तर आपण पुढील पाऊल उचलू अन्यथा इथे थांबू जर साहेबांना माहीत झाले तर आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते अशी त्यांची मध्यरात्री मोबाईलवर बातचीत झाल्यानंतर त्यांनी तब्बल दोनशे पोती गुटखा ताब्यात घेतल्यानंतर ही बातमी वाटाघाटी वाटाघाटींमध्ये नाराज झालेल्या एका व्यक्तीने श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर संबंधित पोलिसांनी हा प्रकार आपल्या अंगलट येऊ नये म्हणून तालुक्यातील राजकीय बड्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्याचे ठरवले पण त्यानेच आपला हात धुवून घेतला मदत मात्र काही केलीच नाही त्यासाठी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस अनेक तास चर्चाही झाल्या पण त्यामधून कोणतेही फळ पोलिसांच्या हाती लागले नाही मात्र यामागे खरे सूत्रधार कोण व हे कोणासाठी काम करतात याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलीस स्टेशनच्या मागे चालणारे व्यवहार कोणाचे
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस मुतारी जवळ एक पोलिसांनी अवैध व्यावसायिक कायम चर्चा करताना दिसतात मात्र ही चर्चा कोणत्या कारणास्तव असते व कोणासाठी असते व कोणासाठी असते अशा अनेक चर्चा लोकांच्या समोर होत आहेत मात्र या प्रकाराला पोलीस मात्र दुजोरा देत आहेत.
Related Posts
चोरी मधील19 आरोपी गायप एक अटक
लिंपंगाव रोड वरील एका ठिकाणी गुटखा चोरी करताना दोन पोलीस आणि खाजगी इसम 18 असे 20 त्या ठिकाणी होते मात्र पोलिसांनी आतापर्यंत फक्त एकाच आरोपीला अटक केली आहे मग बाकीचे एक पोरीचं आहे कुठे जाते पोलिसांना सापडत नाही याचा खुलासा पोलीस अधीक्षक यांनी घेणे गरजेचे आहे.
जेलमध्ये बसण्यासाठी लाखो रुपयाचे बक्षीस
गुटखा चोरी प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी अटक केलेला आरोपी आणि एक पोलिस यांच्यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार होऊन जेलमध्ये बसण्यासाठी लाखो रुपयाची देवाण-घेवाण झाल्याची खुलेआम चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे या प्रकरणाची चर्चा पोलीस अधीक्षक यांनी पथक निवड करून करावी अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.
झेंडा चौकातील पोलीसाचा दोस्त कोण ?
मित्रासाठी आपली नोकरी पणाला लावून श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका कर्मचारी झेंडा चौकातील गुटखाविक्री त्याला मदत केली असा नोकरीवर उदास झालेला पोलिस कोण व त्या पोलिस आता झेंडा चौकातील मित्र कोण याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून लवकरच हे दोघेही पोलिसांच्या समोर येतील असेही समजते.
श्रीगोंदा पोलिसांचे अजब फोन कॉलिंग !
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांचे अवैध व्यावसायिकांची मोठे सलोख्याचे नाते असून यांचे हे नाते तपास आहे असेल तर श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी केलेले अजब फोन कॉलिंग तपासले तर नक्कीच खरे चोर समोर येतील अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे.