श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा लग्नासाठी अडीच लाख देऊन केली फसवणूक

0 398
In Shrigonda taluka, once again, fraud was committed by paying Rs

 

श्रीगोंदा  :- दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या एका गावात लग्नात फसवणूक झाल्याचा प्रकार घडला असून हे प्रकरण ताजे असताना आज पुंन्हा असाच प्रकार समोर आला आहे पण यावेळी नवरी मुलीचा प्रियकर येऊन पळून जाण्याचा तयारीत असतांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

 

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी मध्यंतरी च्या काळात मुलीच्या जन्मदरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने अनेकांचे बासिंगबळ कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत त्यामुळे अनेक मुले लग्नापासून वंचित राहिले आहेत मग मिळेल तशी मिळेल तेव्हा कोणत्याही मुलीशी लग्न करायला मुले तयार होतात त्यातूनच अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत असाच एक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता तो प्रकार ताजा असताना आज पुन्हा एकाची फसवणूक होता होता वाचली असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
 श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावातील एका मुलाचे विवाह होत नसल्याने त्यांनी अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरवात केली त्यातून त्यांच्या नातेवाईकांना वर्धा या ठिकाणी लग्नासाठी मुलगी आहे अशी माहिती मिळाली त्यावर त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी बोलणी केली त्यानंतर लग्न करण्यासाठी 2 लाख 41 हजार रुपये द्यावे लावतील असे त्यांनी सांगितले मग तालुक्यातील त्या वरबापाने पैश्याची रक्कम गोळा केली आणि त्यांना पाठवली त्यानुसार 6 जून रोजी विवाहसोहळा पार पडला त्यात नवरी मुलीला मोठ्या प्रमाणात दागिने करण्यात आले होते.
 मग दि 9 जून च्या पहाटे 5 च्या सुमारास मुलीचा प्रियकर अथवा बनावट नवरा मुलीला पळवून नेण्यासाठी आला तो मुलीला घेऊन पळून जात असताना नवरा मुलाच्या नातेवाईकांना शंका आली मग त्यांनी पाठलाग करून पुई फाट्याजवळ पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मग पोलिसांनी बनावट नवरा अथवा प्रियकर यांच्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू असून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Related Posts
1 of 2,177
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: