श्रीगोंद्यात वृद्धांनां फसवून 91 हजारांचे दागिने भामट्याने पळविले..!

0 184
In Shrigonda, old people were tricked and 91 thousand jewels were snatched by vagrants ...!
 श्रीगोंदा  :- सणाच्या निमित्ताने गरिबांना पैसे मिळत आहेत… तुम्ही गरीब दिसले पाहिजेत.. म्हणत, अंगावरील डाग काढून पाकिटात ठेवायला सांगितले आणि ते दागिने हातचलाखीने भामट्याने लंपास केलेत..! सदरील घटना श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात घडली आहे.

श्रीगोंदयात दिनांक 2 मे 2022 वार सोमवार रोजी होळी गल्ली येथील रहिवासी असलेल्या पापाभाई रहेमान सय्यद यांना व त्यांच्या पत्नी चाँदबी पापा भाई सय्यद यांना श्रीगोंदा तहसीलमध्ये नेऊन एका अनोळखी इसमाने मुलांची ओळख सांगत.. उद्या असलेल्या रमजान ईद सणानिमित्त सरकार 10 हजार रुपये देत आहे. यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा..! आपण गरीब वाटलो पाहिजेत..! असे भासवून, रोख रक्कम आणि दागिने पाकिटात ठेवल्यानंतर ते लंपास केले आहेत.

 

 

Related Posts
1 of 2,427

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, त्या इसमाने चाचाला सोबत घेऊन मला तहसील कार्यालया समोरील झेंड्या खाली बसवले. अंगावरील दागिने काढून दागिन्याचे पाकिट चाचा कडे दिले. त्यांना घेऊन तो इसम तहसील कार्यालयाच्या गेट जवळ गेला. काही वेळाने चाचा परत आले व त्यांनी नमूद अनोळखी इसमाने दागिन्यांचे पाकीट तुझ्याकडे दिले का..?  असे विचारले… तो परत आला नाही म्हटल्यावर मात्र, पाकीट चोरीला जाऊन आपली फसवणूक झाल्याचे अनं विश्वासाघात करून, नमूद अनोळखी इसमाने दागिने चोरल्याची त्यांची खात्री पटली.

यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला सय्यद यांनी त्या अज्ञात व्यक्ती विरोधात भादविका कलम 420, 406 नुसार गुन्हे दाखल आहेत.शेजारी चोर आले आहेत. अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवा.!  तसेच, आता समोर दोन लोकांना पोलिसांनी चोरी करताना पकडले आहे..तुम्ही सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवून खिशात ठेवा, असे म्हणत, सामान्य लोकांना हातचलाखीने लुटण्याचे प्रकार अनेकदा श्रीगोंदा शहरात घडले आहेत. त्यातीलच हा एक प्रकार असल्याचे समोर आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: