श्रीगोंदयात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरी ,पोलीस घेत आहेत झोपेचे सोंग

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरातील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंतनगर परिसरातील ॲड.सुरेंद्र सोनाजी काळोखे हे घरी नसताना त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरात उचकापाचक करून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७० हजाराची चोरी केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत