ससेवाडी येथे जमिनीचे उभ्या वाटण्या होत असून काही गुंडांनी आडव्या वाटण्या दाखवून जागा बळकावली असल्याचा आरोप

अहमदनगर – जेऊर येथील ससेवाडी येथे शेतकऱ्याच्या जमिनीच्या तुकडे बिलामुळे गावातील काही लोकांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून हडप केलेल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार रामदास मल्हारी ससे यांच्यामुळे तुकडे बिलाचे घोटाळे झाले असून. शेतकरी विष्णू राजाराम पाटोळे, विष्णू मोहन ससे, हेश लक्ष्मण ससे, बबन मोहन ससे, साखराबाई भानुदास ससे, तबाजी सिताराम ससे, तुकाराम शंकर ससे यांच्या जागेत झालेला फेरबदल त्वरित रद्द करून न्याय मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
ससेवाडी येथील वरील सर्व जण हे अल्पभूधारक असून गावातील काही गुंडानी आम्हाला उघड्यावर पडले आहे. पूर्वी वडीलोपर्जित जागा उभ्या वाटण्या होत्या आता त्यांनी आडव्या वाटण्या दाखवल्या आहेत व आमच्या जमिनीचे काही क्षेत्र त्यांच्या नावावर करून घेतले आहे. तसेच जया जालिंदर भिंगारदिवे हिने विष्णू राजाराम पाटोळे व स्वर्ग छबु नाना पाटोळे वयोवृद्ध व्यक्तीस तुला कर्ज काढून देतो अशी फसवणूक करून त्यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन एकत्रित जमीन क्षेत्राची गुपचूप खरेदी करून घेतली व भूमिहीन केले. या संदर्भात गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती सरपंच पोलिस पाटील व इतर गावातील प्रमुख रहिवासी यांनादेखील जया भिंगारदिवे यांची सवय माहित आहे. औरंगाबाद खंडपीठाने तुकडा बंदीचे परिपत्रक काढून नियम रद्द केले आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.डी धनुका आणि न्या. एस.जी मेहरे यांनी शासनाचे 12जुलै तुकडा बंदीचे परिपत्रक व महाराष्ट्र नोंदणी नियम सन इस.1961 चे नियम क्र.44(1) ई. गुरुवार 5 मे ला रद्द केले परिणामी राज्यातील अकरा महिन्यापासून ठप्प पडलेले खरेदीखत नोंदणीचा व्यवहार रुजू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मौजे ससेवाडी मध्ये तसेच कितीतरी तुकडे बिलाच्या तक्रारी आहेत हे तर वेळीच मार्गी लागले नाही तर संपूर्ण गावकरी हे धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.