मार्चमध्ये पुन्हा भाजप सरकार , राणे नंतर आणखी एका केंद्रीय मंत्रीचा दावा

0 731

 सांगली  – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी राज्यात मार्च महिन्यात भाजपाची सरकार येणार असल्याची भविष्यवाणी केल्यानंतर राज्यात अनेक चर्चा उधाण आला असून त्यांच्या या वक्तव्याला योग्य ठरवत  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि अडीच वर्ष पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. मार्च किवा एप्रिलमध्ये राज्यात सत्ता बदल होईल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.  (In March, the BJP government again claimed another Union Minister after Rane)

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांना नारायण राणे यांनी केलेल्या भविष्यवाणीवर विचारण्यात आल्याने ते म्हणाले  नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्षांनंतर राज्यातलं सरकार जाईल. त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन नवे सरकार स्थापन होईल, असं ते म्हणाले.

कार्तिकी सोहळयाला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू

केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून, आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेणे गरजेचे आहे. आंदोलन मागे घेतले नाही तर मग शेतकरी नेते राकेश टिकैत आणि अन्य आंदोलकांवर कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी उद्या दिल्लीत मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.(In March, the BJP government again claimed another Union Minister after Rane)

Related Posts
1 of 1,635

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: