खरच प्रेम आंधळ असतं, सात लेकरांची आई पतीला सोडून प्रियकरासोबत फरार.

0 959

लखनऊ – जगात आपण आजपर्यंत प्रेमा (Love) बद्दल खूप काही ऐकले आहे. या प्रेमा बद्दल बोलताना कोणी सांगत प्रेम आंधळ असतं तर कुणी सांगतं प्रेमात धर्म, वय हे पाहिले जात नाही. उत्तर प्रदेश मध्ये अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश मधील गाजीपूरच्या गदाईपूरमधील एक महिला आपल्या मुलींना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत फरार झाली आहे. फरार महिलेच्या सासऱ्याने एका तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

महिलेच्या सासरच्या लोकांना माहिती मिळाली की, त्यांच्या सूनेचं बलिया जिल्ह्यातील तिराहीपूरमध्ये राहणाऱ्या सरदार चौधरीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. सरदार चौधरीची बहीण गदाईपूरमध्ये दिली आहे. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो इथे येत-जात होता. यादरम्यान तो किरण( फरार झालेली महीला) च्या संपर्कात आला. यादरम्यान सरदार आणि किरणची जवळीकता वाढली. काही दिवसांपूर्वी ती तिच्या दोन लहान मुलांना घेऊन प्रियकरासोबत फरार झालाी.

आपल्या तक्रारीत महिलेच्या सासऱ्याने सांगितलं की, त्यांचा मुलगा धनराज चौधरी कामासाठी पंजाबच्या लुधियानात राहतो. मुलाचं लग्न २००३ मध्ये गहमर उत्तर टोलामध्ये राहणाऱ्या किरणसोबत झालं होतं. लग्नानंतर किरणने पाच मुली आणि दोन मुलांना जन्म दिला. एक दिवस किऱण दुपारी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घरातून गहमर औषध घेण्यासाठी निघाली होती. पण रात्री उशीरापर्यंत ती घरी परत आली नाही तर सासऱ्यांनी विचार केला की, उशीर झाल्याने किरण माहेरी थांबली असेल. सकाळी सासऱ्यांनी तिच्या माहेरी जाऊन पाहिलं तर किरण तिथे नव्हती.

Related Posts
1 of 1,608

राज्यात पुढचे चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा इशारा

पोलीस अधिकारी त्रिवेणी लाल सेन यांनी सांगितलं की, महिलेच्या सासऱ्यांनी तक्रार दिली आहे. तरूणावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: