आठ महिन्यात भारतीय संघ खेळणार मायदेशात 21 सामने …

0 87

नवी दिल्ली –   भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत मायदेशात चार कसोटी, तीन वनडे आणि १४ टी-२० असे २१ सामने खेळणार आहे. बीसीसीआय (BCCI) ने पुढील आठ महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वेळापत्रकाची घोषणा केली.(In eight months, the Indian team will play 21 matches at home …)

यानुसार न्यूझीलंड नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान, वेस्ट इंडिज फेब्रुवारी २०२२ला, श्रीलंका फेब्रुवारी- मार्च २०२२ आणि द. आफ्रिका संघ जून २०२२ ला दौऱ्यावर येतील.

हे पण पहा – Exclusive : १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त!

यादरम्यान डिसेंबर २०२१ ला भारतीय संघदेखील द. आफ्रिका दौरा करणार आहे. एप्रिल- मे २०२२ या कालावधीत आयपीएलचे आयोजन होईल. भारताला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-२० आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि पाच टी-२० सामने खेळायचे आहेत.

Related Posts
1 of 58

श्रीलंका संघ भारत दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळेल. द.आफ्रिका संघाचा भारत दौरा केवळ दहा दिवसांचा असेल. या दौऱ्यात पाच टी-२० सामन्यांचे आयोजन होईल. ऑस्ट्रेलियात आणखी एका टी-२० वर्ल्डकप असल्यामुळे १४ टी-२० सामने खेळविण्यावर भर दिला आहे. (In eight months, the Indian team will play 21 matches at home …)

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: