
राज्य सरकारची जाहिरात काय?
किराणा दुकानात वाइन विक्रीबद्दल नागरिकांचे मत देण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे- सर्व नागरिकांना कळवण्यात येते की, सुपर मार्केटमध्ये मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीत वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतच्या अधिसूचनेचा मसूदा दिनांक 31 मार्च 2022 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर मसुद्यावर राज्यातील नागरिकांकडून हरकती किंवा सूचना मागवण्यात येत आहेत. सदर हरकती किंवा सूचना दिनांक 29 जून 2022 अखेरपर्यंत किंवा त्यापुर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीर भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई- 4000023 यांच्याकडे टपालाद्वारे किंवा dycomm-inspection@mah.gov.in या ईमेलवर नोंदवण्यात याव्यात. अधिसूचनेचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ http://stateexcise.maharashtra.gov.in येथे तसेच आयुक्त कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात आले आहे.